Actress Ketaki Chitale booked in Pune cyber police
Actress Ketaki Chitale booked in Pune cyber police SAAM TV
मुंबई/पुणे

केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या; आता पुण्यातही गुन्हा दाखल, अटकेची मागणी

साम ब्युरो

प्राची कुलकर्णी/ गोपाळ मोटघरे

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत टीका करून वाद ओढवून घेणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुण्यातही तिच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीवरून केतकी चितळे, नितीन भावे आणि निखिल भामरे-बागलाणकर याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तसेच केतकी चितळेविरोधात पुणे सायबर पोलिसांकडे आणखी एक तक्रार करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि वकील विकास शिंदेंनी ही तक्रार केली असून, सामाजिक तेढ निर्माण होईल असे लिखाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता पुण्यात सायबर पोलीस ठाण्यातही तिच्यावर गुन्हा नोंदवला आहे. याबाबत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं तिच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, केतकीसह वकील नितीन भावे, निखिल भामरे-बागलाणकर यांच्यावरही गुन्हा नोंदवला आहे.

नितीन भावे याने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट केतकीनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली होती. तर निखिल भामरे-बागलाणकर यानेही पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केतकी, निखिल भावेवर एक गुन्हा, तर निखिल भामरेवर दुसरा गुन्हा नोंदवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केतकीच्या अटकेची मागणी केली आहे. केतकी, नितीन भावे, निखिल भामरे यांच्याविरोधात केवळ गुन्हा नोंदवून चालणार नाही. तर त्यांना तातडीने अटक करावी, असे ते म्हणाले. सिनेसृष्टीत केतकी चितळे हिला मागील दोन वर्षांपासून काम मिळाले नाही. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षा सुरेखा पुणेकर यांनी केली आहे.

केतकी चितळेविरोधात पुण्यात आणखी एक तक्रार

केतकी चितळेला वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणे चांगलेच महागात पडले आहे. पुण्यात गुन्हा (Pune) दाखल झाला असतानाच, आता सामाजिक कार्यकर्ते आणि वकील विकास शिंदे यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुणे सायबर पोलिसांकडे ही तक्रार दिली आहे. सामाजिक तेढ निर्माण होण्याच्या दृष्टीने लिखाण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

कोण आहे तो निखिल भामरे?

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेतील ट्टिट करणाऱ्या निखिल भामरे याला नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे. निखिल हा फार्मसीचा विद्यार्थी आहे. मूळचा सटाण्याचा असलेला निखिल सध्या दिंडोरीतील वरवंडीत शिक्षण घेत आहे. बी. फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला तो आहे. तो आरएसएसच्या शाखेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Edited By- Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MI vs KKR, Toss Prediction: टॉस ठरेल बॉस! KKR ला हरवण्यासाठी मुंबईने आधी काय करावं?

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल, सभास्थळी ६.३० वाजता येणार

Share Market Today : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला, झटक्यात गुंतवणूकदारांचे ३ कोटी बुडाले

SCROLL FOR NEXT