pune news  saam tv
मुंबई/पुणे

Pune : पोलीस निरीक्षकाला बदलीविरुद्ध प्राधिकरणात दाद मागणे भोवलं; पोलीस आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई

पुण्यातील कसूर केलेल्या बदलीविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात दाद मागण्याचे प्रकरण पोलीस निरीक्षकाला चांगलेच भोवले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : पुण्यातील कसूर केलेल्या बदलीविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात दाद मागण्याचे प्रकरण पोलीस निरीक्षकाला चांगलेच भोवले आहे. बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होता, थेट न्यायाधिकरणाकडे धाव घेतली.

त्यामुळे शिस्तीचा भंग केल्यामुळे न्यायाधिकरणानेच संबंधित पोलीस निरीक्षकावर शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार, संबंधित पोलीस निरीक्षकास निलंबित केले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पोलीस (Police) निरीक्षकास बदलीविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात दाद मागणे भोवलं. सदर पोलीस निरीक्षकाने बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होता, थेट न्यायाधिकरणाकडे धाव घेतली.

मात्र, पोलीस निरीक्षकावर शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले. त्याची दखल घेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित पोलीस निरीक्षकास निलंबित केले आहे. रविंद्र मानसिंग कदम असे निलंबन केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. कदम हे चंदननगर ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

नेमकं काय घडलं ?

पोलीस निरीक्षक रविंद्र मानसिंग कदम यांनी कर्तव्यकसुरी केल्यामुळे त्यांची चंदननगर ठाण्याहून थेट दंगा काबू पथकामध्ये केली होती. त्याविरुद्ध कदम यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती. कदम यांनी सादर केलेला अर्ज मॅटने रद्द करीत त्यांच्याकडून झालेल्या बेशिस्त वर्तनाबाबत ताशेरे ओढले होते. तसेच कदम यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश पोलीस (Police) प्रशासनाला दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

मंत्र्याच्या भावाला-पुतण्याला बेदम मारहाण; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT