Pune Crime: अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी 2 तासांत केलं गजाआड Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी 2 तासांत केलं गजाआड

दांडियामध्ये ओळख झालेली मुलगी बोलत नसल्याच्या राग मनात ठेऊन एकाने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: दांडियामध्ये ओळख झालेली मुलगी बोलत नसल्याच्या राग मनात ठेऊन एकाने तिच्यावर प्राणघातक हल्ला (Attack) केला आहे. पुणे (Pune) पोलिसांनी (police) या घटनेनंतर अवघ्या २ तासामध्येच आरोपीला(accused) बेड्या ठोकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहे. यातच आज परत एकदा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी हा २२ वर्षीय तरूण आहे. (Accused assaulting minor girl nabbed Pune police 2 hours)

हे देखील पहा-

त्याने हल्ला केलेली युवती ही अल्पवयीन आहे. पुण्यामध्ये काही महिन्याअगोदर दांडियामध्ये (Dandiya) या दोघांची ओळख झाली होती. मुलीच्या घरातल्या सदस्यांनी तिला या तरुणाशी बोलण्यास, संपर्कात राहण्यास मज्जाव केला होता. यानंतर या युवतीने या मुलाशी बोलणे सोडून दिले होते. अचानकपणे युवतीने बोलणे सोडून दिल्याने आरोपी संतापला होता. रागाच्या भरामध्ये आरोपीने युवतीवर धारदार चाकूने (knife) वार केले आहेत.

या हल्ल्यामध्ये युवती जखमी झाली आहे. युवतीवर हल्ला झाल्यावर आरोपी शहरातून पळ काढण्याच्या तयारीमध्ये होता. अखेर विमानतळ (Airport) पोलिसांनी अवघ्या २ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळले आहे. विमानतळ पोलिसांनी लोहगाव फॉरेस्ट पार्कमधून त्याला अटक (Arrested) करण्यात आला आहे. आरोपी हा पुण्यातील चंदननगर येथील संघर्ष चौकाजवळ राहणारा असून ज्ञानेश्वर निंबाळकर असे त्याचे नाव आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT