accused arrested demanding of marriage continuously Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: उद्योगपतीच्या मुलीकडे लग्नाचा तगादा लावणाऱ्या माथेफिरुला अटक

Mumbai Crime News: नंबर घेतल्यानंतर कालांतराने तो वारंवार फोन करून लग्न करण्यासाठी उद्योगपतीच्या मुलीला आणि घरातील इतर सदस्यांना मेसेज करत होता.

सुरज सावंत

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलीला त्रास देणाऱ्या माथेफिरूला गावदेवी पोलिसांनी (Gaondevi, Vishakhapattanam) विशाखापट्टणम येथून अटक (Arrested) केली आहे. विजयकांत मंडा असे या आरोपीचे नाव असून तो आयटी इंजिनिअर आहे. उद्योगपतीच्या मुलीला गायनाचा छंद होता. एका कार्यक्रमात आरोपीने तिला पाहिले होते, त्यावेळी आरोपीने मुलीच्या स्वीय सहाय्यकाचा नंबर घेतला होता. (accused arrested demanding of marriage continuously)

हे देखील पहा -

नंबर घेतल्यानंतर कालांतराने तो वारंवार फोन करून लग्न करण्यासाठी उद्योगपतीच्या मुलीला आणि घरातील इतर सदस्यांना मेसेज करत होता. या नंतर मुलीने आणि इतर घरातल्यांनी त्याचा मोबाईल ब्लाॅक केला. मात्र आरोपीने थेट घर आणि उद्योगपतीच्या मुलीचे कार्यालय गाठून लग्न करण्याची गळ घालू लागल्यानंतर गावदेवी पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी गावदेवी पोलिसांत मुलीच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ३५४ (ड), ५०३, ४९९, ५०७, ६७ आयटी एक्टनुसार गुन्हा नोंदवून विजयकांत मंडा याला अटक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT