Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; जुन्या मार्गावरुन वाहतुक सुरु

आज सकाळी महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु हाेती.

दिलीप कांबळे

मावळ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (mumbai pune express way) अपघात (accident) झाल्याने जुन्या मार्गावरुन वाहतुक सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खंडाळाकडे जाणारी वाहतूक देखील बाधित झालेली आहे. दरम्यान वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे पुण्याकडे जाणारी वाहतुक (traffic jam) माेठ्या प्रमाणात खाेळंबली आहे. (mumbai pune accident latest marathi news)

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी : एका ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटलेले असावे त्यामुळे ट्रेलरने जवळपास शंभर मीटर रेलींगचा आरसीसीचा भाग ठिकठिकाणी तोडला आहे. ट्रेलर जेव्हा उलटला तेव्हा त्याच्या आजूबाजूला कोणतेही वाहन नव्हते म्हणून मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान या अपघातामुळे आणि सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुणेच्या दिशेने जाणारी लेन बेशिस्त वाहन चालकांमुळे जॅम झाली आहे. काही वेळातच सर्व वाहतूक सुरळीत होईल अशी शक्यता आहे.

दरम्यान ट्रेलरचा अपघात मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने झाला आहे. एकूण २ वाहने अपघातग्रस्त आहेत. ट्रेलरला अपघाताच्या ठिकाणाहून बाजूला काढून अंडा पॉईंटच्या जवळ सुरक्षित जागेत हलविले आहे. या अपघातात आणखी एक वाहन असून ते देखील सुरक्षित जागी ठेवले जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT