Accident, Pune Nashik Highway Saam tv
मुंबई/पुणे

Accident News| मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात; २ जण जागीच ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर खालापूर जवळ भीषण अपघात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई (Mumbai)-पुणे एक्स्प्रेसवे वर खालापूर जवळ भीषण अपघात झाला आहे. हा अपघात माडप बोगद्याजवळ झाला आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्यरात्री उशिरा मुंबईकडे (Mumbai) निघालेल्या इको कारने पुढे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य आरोग्य सेवा, डेल्टा फोर्सच्या जवानांनी घटनास्थळी मदत दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री पुण्याहून मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या ईको कारने खालापूर येथील माडप बोगद्याजवळ एका ट्रकला मागून धडक दिली. या कारमध्ये असेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत, जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचे हुबळीत आंदोलन

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT