Pune Accident News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News : ट्रक आणि कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, चिमुकल्यासह दोन जण जखमी

Pune Accident News : धडकेनंतर कारच्या चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रविण वाकचौरे

सचिन जाधव

Pune Accident News :

पुण्यातील भोर तालुक्यातील ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांच्या चिमुकल्यासह एकजण जखमी आहे. चीव्हेवाडीजवळील देवडी येथे हा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कार किकवीकडून कापूरहोळमार्गे सासवडकडे निघाली होती. तर ट्रक सासवडकडून कापूरहोळकडे निघाला होता. दोन्ही वाहनांची चीव्हेवाडीजवळील देवडी येथे जोरदार धडक झाली. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने थेट कारला धडक दिली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

धडक एवढी भीषण होती की, कार थेट ट्रकच्या खाली घुसली. धडकेनंतर कारच्या चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतांची नावे

गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे (वय २८ वर्ष) आणि तृप्ती अक्षय जगताप (वय २६ वर्ष) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर मयत तृप्ती यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा अक्षय जगताप याच्यासह प्रकाश बाबुराव दरेकर हे जखमी आहेत. (Latest Marathi News)

याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT