Warje Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ५ वर्षांपासून सुरू होता भयानक प्रकार

Pune Crime News in Marathi: पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Shivani Tichkule

अक्षय बडवे

Pune News Today: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कौटुंबिक कलह, अनैतिक संबंध,महिलांवरील अत्याचार या सारख्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

संपूर्ण प्रकरण काय?

शिक्षणासाठी मामाच्या घरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकावून एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या ५ वर्षांपासून हा भयानक प्रकार सुरू होता. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रघुनाथ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत युवतीने वारजे पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवतीला आई वडील आणि कुटुंबातील कोणी नसून ती पुण्यात (Pune) शिक्षणासाठी तिच्या मामाकडे आली होती. सप्टेंबर २०१८ ते जून २०२३ या कालावधीत रघुनाथ जो तिच्या मामाचा मित्र होता याने तिला वेळोवेळी अत्याचार केला. मुलगी अनाथ असल्याचा फायदा घेऊन रघुनाथने याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. अखेर या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT