Abu Azmi Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Abu Azami: अजित पवार गटात प्रवेश करणार का? अबू आझमींनी स्पष्टच सांगितलं

Abu Azmi Latest News: अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहे. पण आमची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

Abu Azmi Ajit Pawar Group Latest News

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसणार, मानखुर्दचे आमदार अबू आझमी लवकरच  अजित पवार गटात (Ajit Pawar) प्रवेश करणार, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. मात्र, अबू आझमी यांनी अजित पवार गटात होण्याच्या सामील होण्याच्या चर्चांचं खंडन केलं आहे.

अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहे. पण आमची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत माझं वैयक्तिक काम होतं. म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. असंही अबू आझमी यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रफुल्ल पटेल आणि माझ्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. याचा आणि रईस शेख यांच्या राजीनाम्याचा काही संबंध नाही. रईस शेख यांना स्थानिक पातळीवर काही बदल हवे आहेत. त्यांना वाटत असेल की, त्यांचे भविष्य दुसरीकडे कुठे आहे, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, असं देखील अबू आझमी म्हणाले.

अबू आझमी यांच्याकडे एक दोन नाही, तर चारशे कोटींची बेनामी मालमत्ता असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मुंबई, भिवंडी आणि वाराणसीत ही मालमत्ता असल्याचेही सोमय्या यांचे म्हणणे आहे. या आरोपाला देखील अबू आझमी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप चुकीचा आहे. यासंदर्भात मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. त्यांनी जे लिहलेलं आहे, ते चुकीचं आहे. त्यांना जे करायचं आहे ते करू द्या, असं म्हणत अबू आझमीने सौमय्यांच्या आरोपांचं खंडण केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घरकुल कामासाठी ३ हजारांची लाच घेताना सावरगावचा ग्रामरोजगार सेवक (acb)च्या जाळ्यात

Maharashtra Weather : राज्यात मेघगर्जनेसह २ दिवस पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामान विभागानं काय सांगितलं?

Akshay Kumar Eye Surgery: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर शस्त्रक्रिया; रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

सुवेंदू अधिकारींच्या PA ची निर्घृण हत्या, १० राउंड फायरिंग;५ गोळ्या आरपार घुसल्या, तपासात धक्कादायक खुलासे

Crime News : पती दारू पिऊन छळ करायचा, वैतागलेल्या पत्नीने केली हत्या; जळगावातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT