Abhishek Ghosalkar   Saam Tv
मुंबई/पुणे

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

मुंबई: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. पोलिसांनी ९० दिवसांच्या आत अवघ्या ६० दिवसात मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं. मात्र पोलिसांनी मूळ तक्रारदार आणि अभिषेकची पत्नी तेजस्वीचं म्हणणं नीट ऐकून घेतलं नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय केलाय. या हत्येप्रकरणातील याचिकेवरील सुनावणी जून महिन्यापर्यंत तहकूब करण्यात आलीय.

घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. पोलिसांनी ९० दिवसांच्या आत तपास पूर्ण करत ६० दिवासांमध्येच आरोपपत्र दाखल केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. मात्र पोलिसांच्या या दाव्याला घोसाळकर यांनी विरोध केलाय. मूळ तक्रारदार आणि अभिषेकची पत्नी तेजस्वीचं म्हणणं नीट ऐकून घेतलं नसल्याचा आरोप कुटुंबियांचा केलाय. यावर पोलिसांनी कोर्टातच उत्तर दिलंय. तक्रारदार रोज काहीतरी नवीन कागदपत्र सादर करत असल्याची तक्रार पोलिसांकडून करण्यात आली.

हत्येसंबंधित सर्व फुटेज गुगल टाईमनुसार ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांनी केलाय. मात्र कुटुंबियांच्या आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत सर्व सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवण्यात यावेत असे निर्देश पोलिसांना दिलेत. दरम्यान आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं सर्व काही कुटुंबियांना दिल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT