Abhijeet Bichukale  Saam Tv
मुंबई/पुणे

Abhijeet Bichukale : अभिजीत बिचुकलेंच्या अडचणीत वाढ; ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी

लहुजी छावा संघटनेने अभिजीत बिचुकले यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Abhijeet Bichukale Latest News : नेहमी चर्चेत असलेल्या अभिजीत बिचुकलेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. लहुजी छावा संघटनेने अभिजीत बिचुकले यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अभिजीत बिचुकले यांनी कोण लहुजी? म्हणून उल्लेख केला होता. बिचुकले यांच्या या वक्तव्याने महार आणि मांग यांच्यात जातीय तेढ निर्माण होईल असं या संघटनेचा आरोप आहे त्यामुळे बिचुकले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अभिजीत बिचुकलेंना जीवे मारण्याची धमकी

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. कसबा (Kasba) मतदारसंघ पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा, अशा धमक्या येत असल्याचा आरोप बिचुकले यांनी केला आहे. अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी याबाबत थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.

पत्रात बिचुकले यांनी म्हटलं की, मी कसबा निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर मला विरोधकांकडून अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच मला पुणे सोडून जाण्यास सांगितलं जात आहे. तुम्ही पुणे सोडून न गेल्यास तुमचा खून करु अशी धमकी दिली जात आहे, असं बिचुकलेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

धमक्या येत असलेले फोन नंबर देखील बिचुकले यांनी पत्रात दिले आहेत. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण मिळावं, तसेच मला धमकी देणाऱ्यांना तत्काळ अटक करावी अशा मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकींमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

Diwali Lucky Rashi: दिवाळीत 'या' राशींची होणार चांदी, खिशा पैशांनी भरणार

१८६ महागड्या कार खरेदी करत २१ कोटी रुपयांची बचत, गुजरातमध्ये जैन समाजाने लढवली अजब शक्कल; प्रकरण काय?

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

SCROLL FOR NEXT