Aaditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray : दिशा सालियान प्रकरणात आरोप झाल्यानंतर आदित्य ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

दिशा सालियान प्रकरणात आरोप झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची शक्यता आहे.

Rashmi Puranik

Aadiya Thackeray News : दिशा सालियान प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोप केले जात आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर हिवाळी अधिवेशनात गंभीर आरोप केले. त्यानंतर दिशा सालियान प्रकरणात आरोप झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे कोर्टात जाऊन अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना घेरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सत्ताधारी आमदारांनी विधीमंडळात दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर दिशा प्रकरणात सीबीआयने देखील चौकशी केली नााही, असा खुलासा त्यांनी केली. सीबीआयने यासंदर्भात परिपत्रक काढून दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा दावा सातत्याने भाजपचे आणि शिंदे गटाचे काही नेते करत आहेत. तसेच रिया चक्रवर्तीला AU म्हणून जे 44 कॉल आले होते ते आदित्य उद्धव ठाकरे यांचेच होते, असा दावा शिंदे गटाचे खासदार शेवाळे यांनी केला आहे . तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशीही मागणी विधिमंडळात केली.

या सर्व आरोपानंतर आदित्य ठाकरे हे दिशा सालियान प्रकरणात कोर्टात जाण्याच विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच आदित्य ठाकरे हे कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT