Aaditya Thackeray Net Worth Saam Tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray Net Worth : बीएमडब्लू कार, दोन गाळे, कोट्यवधीचे दागिने; किती आहे आदित्य ठाकरे यांची संपत्ती? वाचा...

Aditya Thackeray Property News: निवडणूक प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

गिरीश कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करत वरळी विधानसभा मतदारसांघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्र त्यांनी आपली संपत्तीची माहितीही दिली आहे. तसेच त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल आहे का? याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

किती आहे आदित्य ठाकरे यांची संपत्ती?

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जागा आहे. ज्याचं आताचं बाजार मूल्य १ कोटी ४८ लाख ५१ हजार ३५० रुपये आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. ज्याचं आताचं बाजार मूल्य ४ कोटी ५६ लाख रुपये आहे.

किती आहेत दागिने?

आदित्य ठाकरे यांच्याकडे बीएमडब्लू कार आहे. तसेच त्यांच्याकडे १ कोटी ९१ लाख ०७ हजार १५९ रुपयांचे दागिने आहेत. त्यांची जंगम मालमत्ता १५ कोटी ४३ लाख ०३ हजार ०६० रुपये आहेत. तर अचल मालमत्ता ६ कोटी ०४ लाख ५१ हजार ३५० रुपये आहे.

याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या बँक खात्यात २ कोटी ४४ लाख १८ हजार ९८५ रुपये आहेत. तसेच ठाकरे यांच्या बँक खात्यात फिक्स डिपॉसिटमध्ये २ कोटी ८१ लाख २० हजार ७२३ रुपये आहेत. त्यांनी ७० हजार रुपयांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी १० कोटी १३ लाख ७८ हजार ०५२ रुपये गुंतवले आहेत. तसेच त्यांच्याकडे ५० हजार रुपयांचे बॉण्ड्स आहेत. यातचत्यांची एकूण गुंतवणूक (स्वतः) १० कोटी १४ लाख ९८ हजार ०५२ रुपये आहे. आदित्य ठाकरे यांची एलआयसी पॉलिसी २१ लाख ५५ हजार ७४१ रुपयांची आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. मात्र याप्रकरणी चार्जशीट दाखल झालेली नाही.. डिलाईल रोड खुला केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय, अशी माहिती त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT