Aaditya Thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray News: शिंदे सरकारला लाज वाटली पाहिजे; जालन्यातील घटनेवरून आदित्य ठाकरे कडाडले

Maratha Aarakshan: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. ते मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलत होते

Vishal Gangurde

रुपाली बडवे

Aaditya Thackeray News In Marathi:

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जवरुन राज्यभरात राजकारण तापलं आहे. विरोधकांसह सकल मराठा समाजाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या घटनेनंतर विरोधी नेते मराठा आंदोलकांची भेट घेत आहेत. जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी लाठीमार केला. यात अनेक तरुण आणि आंदोलक महिला जखमी झाल्याचं वृत्त आहे.

आंदोलन करणाऱ्या आंदोलकर्त्यांवर पोलिसांनी का लाठीमार केला, यावरून विरोधक सरकारला जाब विचारत आहेत. पोलिसांना लाठीमार करण्याचा आदेश कोणी दिला, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जाते.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार जनरल डायरचं आहे की महाराष्ट्राचं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. तसेच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना न कळवता पोलीस अशाप्रकारे लाठीचार्ज करतील, हे अशक्य आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, जालन्यातील घटना सर्वांनी पाहिलीय. लाठीमारची घटना भयानक आहे. एखाद्या शत्रूवर हल्ला करावा, अशाप्रकारे लाठीमार करायला लावला आहे. मी अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलंय'.

'इतकं संवेदनशील आंदोलन होत असताना मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलीस लाठीचार्ज कसा करतील? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना हे १०० टक्के माहिती असणार. त्यामुळे सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. लाज असेल तर राजीनामा देतील, असे ते म्हणाले.

दरम्यान, बारसू येथील आंदोलन झालं होतं, तेथेही महिलांवरही लाठीमार झाला होता. त्यानंतर वारकऱ्यांवरही पोलिसांकडून असाच लाठीचार्ज करण्यात आला होता. आता मराठा समाजाच्या तरुणांवर लाठीचार्ज झाला. यामुळे हे सरकार जनरल डायरचं आहे का असा प्रश्न पडत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारकडून राबवण्यात येणारा शासन आपल्या दारी या उपक्रमावरुनही त्यांनी टीका केली आहे. सरकार शासन आपल्या दारी असं म्हणत आहे, पण ते लाठी घेऊन आपल्या दारी आले आहेत का? अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.

वरळीमध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा घेतली जात आहे. यावरुन बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, चांगलं आहे ते वरळीत कार्यक्रम घेत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. परंतु ते प्रत्येकवेळी टार्गेट करतात. वरळीत येताना मी एक बॅनर पाहिलं, त्यात परिवर्तन होणार असल्याचं म्हटलंय. यावरुन कळतंय की परिवर्तन होणार आणि हे सरकार जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT