Aaditya Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray : 'खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय'; आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर मोठा आरोप

आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल सुरूच आहे.

साम टिव्ही ब्युरो

Aaditya Thackeray News : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल सुरूच आहे. रेसकोर्सची जागाही व्यावसायिक हितसंबंधांसाठी देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे. (Latest Marathi News)

आमदार आदित्य ठाकरे यांनी रेसकोर्सच्या जागेवरून ट्वीट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय! समजलेल्या माहितीप्रमाणे वरळी डेअरी बिल्डर्सच्या घश्यात घालण्यासोबतच रेसकोर्सची जागाही व्यावसायिक हितसंबंधांसाठी देण्याचा प्रयत्न सुरु आहे'.

'या जागेवर ‘हाईडपार्क’ सारखं मोठं उद्यान व्हावं, जिथे आबालवृद्धांसाठी निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या जागी फिरण्याची सोय असावी, मुंबईकरांसाठीची ही सगळ्यात मोठी मोकळी जागा असावी अशी संकल्पना उद्धव ठाकरेजी यांनी मांडली होती, असे पुढे म्हणाले.

'ही मुंबईकरांच्या हक्काची विनामूल्य असणारी जागा आता खोके सरकार व्यावसायिक हितसंबंध असणाऱ्यांच्या घश्यात घालू पाहतंय! पण आम्ही ते होऊ देणार नाही! मुंबईकरांच्या हक्काची इंच इंच जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जावी ह्यासाठी आम्ही लढत राहू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT