Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

मुंबईच्या तलावात बुडणाऱ्या तरुणीला वाचवायला गेला तरूण; दोघांचाही बुडून मृत्यू

आंबावाडी येथे राहणारे संदीप टबाले, सागर टबाले, यश नार्वेकर आणि ही तरुणी पोहण्यासाठी आरे कॉलनी, पवईच्या मध्यावर असलेल्या विहार तलावात गेले होते.

जयश्री मोरे

मुंबई : विहार तलावामध्ये पोहायला गेलेल्या आरे कॉलनीमधील चार जणांपैकी एक तरुणी आणि एक पुरुष बुडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणी तलावात पोहण्यासाठी गेली असता ती बुडाली ती बुडत असल्याचं दिसताच तिला वाचवण्यासाठी तिच्यासोबत असलेला संदीप पाण्यात उतरला मात्र, ते दोघेही तलावात बुडाले. संदीप काशिनाथ टबाले वय वर्ष ४० तर १८ वर्षीय एक तरुणीचा या तलावात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान आरे कॉलनीमधील आंबावाडी येथे राहणारे संदीप टबाले, सागर टबाले, यश नार्वेकर आणि ही तरुणी पोहण्यासाठी आरे कॉलनी, पवईच्या मध्यावर असलेल्या विहार तलावात गेले होते. मात्र पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने संदीप आणि तरुणी पाण्यात बुडाले. या वेळी इतर दोघांनी याची माहिती आरे पोलिसांना (Police) दिली.

पोलिसांनी अग्निशमन दल आणि मुलुंड पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला असता आज सकाळी या दोघांचे मृतदेह हाती लागले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून मुलुंड पोलीस (Mulund Police) पुढील तपास करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Tips : तुमच्या चेहऱ्यानुसार आयब्रोचा आकार कसा असावा? सुंदर दिसण्यासाठी ठरेल फायदेशीर

ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी महागडी औषधे नको, किचनमधील 'या' 5 गोष्टींचा आहारात करा समावेश

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Abhijit Dipke: CJPच्या आंदोलनाला परदेशातून फंडिंग मिळाल्याचा आरोप; अभिजीत दिपकेंनी दिलं थेट उत्तर

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT