Ambernath News Saam TV
मुंबई/पुणे

Ambernath News : मोबाईलवर व्हिडीओ बनवत तरुणाने संपवली जीवयात्रा; मन सुन्न करणारी घटना

मोबाईलवर व्हिडीओ बनवत एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : मोबाईलवर व्हिडीओ बनवत एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. बदलापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. बेरोजगारीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं या तरुणाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. आपल्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे, याचा खुलासा या व्यक्तीने व्हिडिओ आणि सुसाइड नोट च्या माध्यमातून केला आहे. (Latest Marathi News)

गिरीश नंदलाल चूबे असे या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याला दोन लहान मुले आहेत. गिरीश उल्हासनगर येथे एका कंपनीत कामाला होता. या कंपनीत काम करणाऱ्या दोन लोकांनी गिरीश याच्या मालकाला चुगली केली आणि त्यामुळे गिरीश याला आपला जॉब गमवावा लागला.

दोन मध्ये जॉब नसल्यामुळे गिरीश वर एक लाखापर्यंत कर्ज झालं. त्याच नैराश्यातून गिरीश याने आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. केवळ दोन लोकांमुळे आणि बेरोजगारीमुळे आपल्यावर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढवल्याचा आरोप गिरीश ने केला आहे.

आपण बदलापूर आणि अंबरनाथ (Ambernath) रेल्वे स्थानक दरम्यान असून ट्रेन खाली उडी घेऊन आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ गिरीशने शेअर केला आहे. या घटनेत गिरीश याचा मृत्यू झाला असून कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT