Amit Shah Security Mistake Saam TV
मुंबई/पुणे

Amit Shah Security: अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक; ताफ्यात अचानक दुचाकीस्वार शिरला अन्...

Amit Shah Security News: गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा जात असताना मध्येच त्यांच्या ताफ्यात एक दुचाकीस्वार शिरला.

साम टिव्ही ब्युरो

Amit Shah Security Mistake: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास अमित शहा मुंबईत दाखल झाले. दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर सांताक्रूजवळील वाकोल्यात त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक घडली. गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा जात असताना मध्येच त्यांच्या ताफ्यात एक दुचाकीस्वार शिरला.  (Latest Marathi News)

अचानक अमित शहांच्या (Amit Shah) ताफ्यात दुचाकीस्वार शिरल्याने गोंधळ उडाला.पोलिसांनी तातडीने सतर्कता बाळगत दुचाकीस्वाराला बाजूला केलं आणि अमित शहा थेट सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना झाले. दरम्यान, अमित शाह यांच्या हस्ते उद्या निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. (Maharashtra Political News)

त्याचबरोबर अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर आज महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत. या बैठकांमध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणूक, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे. अगदी थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार असून या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. (Breaking Marathi News)

अमित शहांनी घेतली विनोद तावडेंची भेट

दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सर्वात आधी महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. विनोद तावडे हे सध्या केंद्रीय कार्यकारिणीत कार्यरत आहेत. पण दोन दिवसांपूर्वी विनोद तावडे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तावडे यांच्या आईचं निधन झालं. त्यामुळे अमित शाह मुंबईत दाखल होताच विनोद तावडे यांच्या घरी गेले. त्यांनी तावडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT