Mumbai Reay Road  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Reay Road Fire : मुंबईत अग्रितांडव! रे रोड परिसरातील गोदामाला आग, अग्निशमन दलाचे १० अग्निबंब घटनास्थळी

Mumbai Reay Road fire update : मुंबईतून आगीची मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईच्या रे रोड परिसरातील गोदामाला आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, मुंबई

मुंबई : मुंबईतून आगीची मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईच्या रे रोड परिसरातील गोदामाला आग लागल्याची माहिती मिळत आहे. या गोदामाला आग लागल्याची घटनेने अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील रे रोड परिसरात गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ब्रिटनिया कंपनी शेजारील देवीदयाळ कंपाऊंड येथील तळमजला आणि एकमजली गोदामाला आग लागली. या गोदामाला सकाळी १०.१५ च्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला आग छोटी होती, मात्र काही मिनिटानंतर या आगीचा भडका उडाला.

या भीषण आगीच्या धुराचे लोट हवेत दूरवर पसरले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धााव घेतली. अग्निशमन दलाचे १० अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांसोबत स्थानिक पोलीस, आरोग्य क्षेत्रातील कर्माचारी आदी यंत्रणेतील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु केले.

या गोदामाला आग नेमकी कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान या या आगीच्या कारणाचा तपास करत आहेत. या आगीत गोदामाचे नुकसान झालेले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पवईत झोपडपट्टीला भीषण

पवईच्या जय भीम नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या दहापेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले आहे. या आगीत दहा ते बारा झोपड्या जळून पूर्णतः खाक झाल्या आहेत. आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही आग घरातील असलेल्या देव मंदिरातील दिव्यामुळे लागली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT