एका फेसबुक पोस्टने गॅस वाला झाला "सिलेंडर मॅन" अजय दुधाणे
मुंबई/पुणे

एका फेसबुक पोस्टने गॅस वाला झाला "सिलेंडर मॅन"

अंबरनाथ मधील एक सिलेंडरमॅन चांगलाच व्हायरल होत आहे. तो आहे सागर जाधव. सागरची कथा ही एक वेगळी आहे.

अजय दुधाणे

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथ Ambarnath मधील एक सिलेंडरमॅन Cylinder Man चांगलाच व्हायरल होत आहे. तो आहे सागर जाधव. सागर ची कथा ही एक वेगळी आहे. A Facebook post turned gas man into "Cylinder Man"

सचोटीने वागले तर श्रमाला प्रतिष्ठा मिळते, हे ह्या सागर जाधव च्या रूपाने कामगारांना प्रेरणादायी काम काहीही असो , काम हे काम असतं, सागर हा चांगला बॉडी बिल्डर असून, तो गेली बारा वर्ष अंबरनाथ बी केबिन रोड वर असलेल्या रेणू गॅस सर्व्हिस मध्ये काम करतो.

पाच दिवसांपूर्वी तो गॅस डिलिव्हरी करत असताना तुषार भामरे नावाच्या व्यक्तीने फोटो काढला आणि तो फेस बुक वर पोस्ट केली. त्यावर लिहलं होतं ,एखाद्या वेब सिरीज मधलं कॅरेक्टर वाटावं असे रूप असलेला "सिलेंडर मॅन".

हे देखील पहा-

या पोस्ट ने सागर चांगलाच व्हायरल Viral झाला आहे. त्याची ही पोस्ट माजी आयुक्त तुकाराम मुंडे Tukaram Munde, मराठी कलाकार कुशाल बद्रिके Kushal Badrike अश्या मान्यवर व्यक्तींनी शेअर आणि लाईक केली आहे. जेव्हा कामाला लागला तेव्हा तो शरीराने बारीक होता, तेव्हा त्याला सिलेंडर उचलायला त्रास व्हायचा.

तेव्हा रेणू गॅस एजन्सी चे मालक शामकांत जाधव यांनी त्याला व्यायाम शाळा लावण्याचा सल्ला दिला. मेहनत करून त्याने शरीर कमवले. सागर हा लहानपणा पासून अनाथ आहे. तो चांगला इमानदार मुलगा असून त्याच्या या प्रसिद्धी मूळे आम्ही चांगलेच आनंदी झाल्याचे रेणू गॅस एजन्सीचे डॉ शामकांत जाधव म्हणले आहेत.

चांगली संधी आली तर वेब सिरीज वर काम करू शकतो. तसेच गॅस वाला म्हणून अशी आमची ओळख होती मात्र ती ओळख या पोस्ट ने बदली केली असून आता सिलेंडर मॅन ही ओळख आम्हाला मिळाली आहे. कोणतही काम लहान नसून कामात सचोटी पाहिजे आणि प्रामाणिक पणा, मी या कामात समाधानी असून मला हे आवडत असल्याचे सागर जाधव व्यक्त केलं आहे.

Edited By-Sanikab Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT