Nawab Malik Saam TV
मुंबई/पुणे

Nawab Malik : नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. मात्र, त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर आता अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. (Nawab Malik Latest News)

ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) अटक केली होती. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे एनसीबीची कारवाई वादाचा विषय बनली. या वादाच्या केंद्रस्थानी NCB मुंबईचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे होते. मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले होते.

समीर वानखेडे यांच्यावर जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल वाशिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांची सुनावणी मंगळवारी झाली. या प्रकरणी समीर वानखेडे यांचे चुलत बंधू संजय वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी कोर्टानं मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, वाशिम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, पोलिसांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आधीच जेलमध्ये असलेल्या नवाब मलिक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

समीर वानखेडे यांनी याचिकेत काय म्हटलं होतं?

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे कुटुंबियांची बदनामी झाल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला होता. समीर वानखेडेंनी या प्रकरणी वाशिम सत्र न्यायलयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी नवाब मलिकांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT