Vishwas Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Vishwas Patil: ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील

Marathi Sahitya Sammelan: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आज पुण्यामध्ये महामंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

Priya More

Summary -

  1. साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झाली.

  2. महाराष्ट्र साहित्य परिषदेत सर्व घटक संस्थांच्या सहमतीने त्यांचे नाव निश्चित झाले.

  3. ‘पानिपत’कार म्हणून प्रसिद्ध असलेले विश्वास पाटील शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या संमेलनाचे नेतृत्व करणार आहेत.

  4. या संमेलनामुळे मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक वारशाला आणि साहित्य परंपरेला नवसंजीवनी मिळणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये यंदाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. पुण्यामध्ये आज महामंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे होणार्‍या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या निवडणुकीत हा निर्णय घेण्यात आला. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेले आगामी साहित्य संमेलन एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची निवड होण्याचा अनोखा योगायोग यानिमित्ताने जुळून आला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीला महामंडळाच्या चारही घटक संस्थांसह संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संस्थांनी अध्यक्षपदासाठी सुचवलेल्या नावांवर या बैठकीत चर्चा झाली. विश्वास पाटील यांच्या नावाला बहुतांश सदस्यांनी सहमती दर्शवल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT