Uday Samant Saam Tv
मुंबई/पुणे

तरुणांच्या रोजगाराची सोय होणार; कोकणात हा मोठा प्रकल्प राबविण्यात येणार

जेएसडब्लू कोकणात करणार सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर आली. यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला. या पार्श्वभूमिवर आता पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभारणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती आहे. जेएसडब्लू कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. आज रायगड येथील पेण येथील जेएसडब्लू निओ एनर्जी प्रकल्पाच्या सामंजस्य करारासंदर्भात आयोजित मंत्रालयातील बैठकीतवेळी मंत्री सामंत (Uday Samant) बोलत होते.

तरुणांना कायमस्वरुपी नोकरी

जेएसडब्लूच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ४५० तरूणांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारे आपले सरकार आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा आहे, असंही मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT