Saam Tv
मुंबई/पुणे

'झुकेगा नहीं!' म्हणत राणा दाम्पत्याविरोधात 92 वर्षीय शिवसैनिक आजी रस्त्यावर (पाहा Video)

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना आक्रमक झालेली असताना एक 92 वर्षीय आजी या देखील रणांविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई: मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना आक्रमक झालेली असताना एक 92 वर्षीय आजी या देखील रणांविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. राणा दाम्पत्यान इथे येऊन दाखवावं असं आव्हान या आजीनी दिलं आहे.

राणा दाम्पत्याच्या आव्हानावर आजी म्हणाल्या, मुख्यमंत्रांना आव्हान दिलय ना, मग कालच्यापासून 9 चा टाइम दिला होता ती घाबरून का नाही आली बंगल्यावर ? आम्ही शिवसैनिक घाबरून राहणारे नाही, आम्ही वार करणारे आहोत, झुकेगा नहीं असा पुष्पा चित्रपटातील डायलॉगही आजींनी म्हंटला आहे.

आजी म्हणाल्या, मातोश्रीला तिने आव्हान दिलं होत ना? मग ती घाबरली? तुझं आव्हान आहे ना तिकडे दाखवायचं मुंबई मध्ये येऊन कोणी तुझं आव्हान घेणार नाही. तर बाळासाहेब असते तर त्यांनी हनुमान चालीसा ला समर्थन दिलं असत असे राणा दाम्पत्याने म्हणते होते त्यांच्या या वक्तव्यालाही आजींनी उत्तर दिलंय की, तिला दिल नसत, आजींच्या या उत्तरावर तेथे जमलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आहे. त्या म्हणल्या, "बाळासाहेब आता पाहिजे होते, बाळासाहेबांचे हे सांगेल सैनिक आहेत. बाळासाहेब गेले नाहीत ते वरून बघत आहेत. असेही आजी म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ-

राणा दाम्पत्य म्हणाले होते शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, यावर आजी म्हणाल्या, शिवसेना कधीच हिंदुत्व सोडणार नाही. मरेल पण सोडणार नाही. आम्ही जाणार तर भगव्यातच जाणार, कधीच झुकणार नाही. यावेळी आजींसोबत युवा नेते वरून सरदेसाई देखील उपस्थित होते.

तर शिवसैनिक आजींची मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन वरून विचारपूस केली आहे तसेच आजींना काळजी घ्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT