Mumbai Crime News In Marathi Twitter/@ANI
मुंबई/पुणे

मुंबईत 90 वर्षीय वृद्धाने केली पत्नी-मुलीची हत्या; पोलिसांना सांगितलं धक्कादायक कारण...

मुंबईत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 90 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि अपंग मुलीचा गळा कापून चाकूने खून केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 90 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि अपंग मुलीचा गळा कापून चाकूने खून केला आहे. चौकशीत या व्यक्तीने हत्येमागचे कारण उघड केल्याने पोलिसही आश्चर्यचकित झाले. वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी सांगितले की, त्या व्यक्तीने चौकशीत सांगितले की, तो मुलगी आणि पत्नीची काळजी घेत असे. आपल्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलीचा सांभाळ कोण करणार याची त्यांना खूप चिंता होती. या काळजीमुळे त्यानंतर त्याने दोघांची हत्या केली. (Mumbai Crime News In Marathi)

पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात;

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम गंधोक असे या व्यक्तीचे नाव आहे. 6 फेब्रुवारीच्या रात्री गंधोकने त्याची 89 वर्षीय पत्नी आणि 55 वर्षीय मुलीची एकापाठोपाठ एक भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. एका वृत्तानुसार, या घटनेनंतर मुंबई पोलीस त्याच्या मेघवाडी येथील घरी पोहोचले. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून गंधोक यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

रिपोर्टनुसार, पुरुषोत्तम गंधोक त्याची पत्नी आणि मतिमंद मुलीसोबत राहत होते. पत्नीचे वय आणि काही आजारांमुळे ते आणि त्याची मुलगी जवळजवळ पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून होते असे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे मी गेल्यानंतर यांचा संभाळ कसा होणार ? अशी भीती त्यांना वाटत होती, त्यानंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT