9 buffaloes passed in nagar due to electrocuted Saam Digital
मुंबई/पुणे

शेतकरी हळहळले! विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यु,10 लाखांचे नुकसान

रात्री साडे आठच्या सुमारास म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी एंगलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने म्हशींचा मृत्यू झाल्याचे समाेर आले.

Siddharth Latkar

नगर जिल्ह्यातील भेंडा बुद्रुक येथे विजेचा धक्का लागल्याने 9 म्हशींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे शेतक-यांचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. (Maharashtra News)

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे फुलारी वस्ती परिसरात ज्ञानदेव शिरसाठ आणि शिवाजी शिरसाठ यांच्या राहत्या घराजवळ म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांच्या 12 म्हशी बांधलेल्या होत्या.

रात्री साडे आठच्या सुमारास म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी एंगलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने म्हशींचा मृत्यू झाल्याचे समाेर आले. यामध्ये ज्ञानदेव यांच्या 5 तर शिवाजी यांच्या 4 अशा एकूण 9 म्हशींचा विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यु झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत 3 म्हशी बचावल्या आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 9 पैकी 7 म्हशी गाभणी तर 2 म्हशी दूभत्या होत्या. या घटनेचा महसूल तसेच पोलिस दलाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT