court orders bail Saam Tv
मुंबई/पुणे

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणातील ८९ एसटी कामगारांची तळोजा तुरुंगातून सुटका

या एसटी कर्मचा-यांना कामावर रुजू व्हायचे की नाही अद्याप समजलेले नाही.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्या प्रकरणातील ८९ एसटी कामगारांना (msrtc employee) आज (मंगळवार) जामीन (bail granted) मिळाला आहे. या सर्वांची तळोजा तुरुंगातून (taloja jail) सुटका करण्यात आली आहे. (sharad pawar latest marathi news)

राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण हाेत नसल्याचा राग मनात धरुन काही दिवसांपुर्वी एसटी कर्मचा-यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याची घटना घडली हाेती. या प्रकरणात ८९ जणांना अटक (arrest) झाली हाेती.

या सर्वांना गेल्या १८ दिवसांपासून तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले हाेते. आज न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

पुण्यात अग्नितांडव; महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी|VIDEO

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी घरात कोणत्या गोष्टी आणल्यास मिळते संपत्ती आणि समृद्धी?

Student Death : सीनियरच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील NDA च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे गूढ उकललं?

Belagavi News: रायबागमध्ये घडलं विचित्र; बापानं १९ वर्षीय जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध; जेवणाला गावाला बोलवलं

SCROLL FOR NEXT