Leopard Attack Yandex
मुंबई/पुणे

Leopard Attack: जुन्नर हादरलं! अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; दीड महिन्यातील तिसरी घटना

Leopard Attack In Junnar: जुन्नर तालुक्यात पुन्हा एक चिमुकला बिबट्याचा शिकार बनला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

Rohini Gudaghe

रोहिदास गाडगे साम टीव्ही,

अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झालाय. जुन्नर तालुक्यात पुन्हा एक चिमुकला बिबट्याचा शिकार (Leopard Attack) बनला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्याची दिड महिन्यातील ही तिसरी घटना आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे जुन्नरमधील ग्रामस्थांमध्ये आता दहशतीचं वातावरण दिसून येत आहे.

अंगावर काटा आणणारी ही घटना आहे. आता बिबट्याच्या हल्ल्यामुळे जुन्नरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे ही घडली घटना घडली आहे. रुद्र महेश फापाळे, असं या चिमुकल्याचं नाव (Leopard Attack In Junnar) आहे. रूद्र यात्रेसाठी गावी आला होता. हल्ला करत बिबट्याने रूद्रला ठार केलं आहे. निरागस रूद्रच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रूद्रच्या मृत्युमुळे त्याच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रूद्र घरासमोरील अंगणात खेळत होता. याचवेळेस एक बिबट्या आडोशाला दबा धरून बसला होता. याची पुसटशीही कल्पना निरागस रूद्रला नव्हती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रूद्रवर हल्ला (Junnar News) केला. यावेळी बिबट्याने पुन्हा एका चिमुकल्याची शिकार केली आहे. या घटनेनंतर मात्र आथा काळवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जुन्नरमधील दीड महिन्यातील बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे.

११ एप्रिल रोजी जुन्नरमधील शिरोली खुर्द गावात बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला (Leopard Attack News) केल्याची घटना घडली होती. या घटनेत संस्कृती कुळेकर नावाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. शेतीपासून काही अंतरावर या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनांमुळे जुन्नरमधील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT