Mumbai Train News Saamtv
मुंबई/पुणे

Pune-Mumbai Train Cancelled: मुसळधार पावसाचा फटका, पुणे- मुंबई मार्गावरील सिंहगड, डेक्कन क्वीनसह 5 रेल्वे गाड्या रद्द

Mumbai-Pune Train News: मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या ५ रेल्वेगाडया रद्द करण्यात आल्या आहेत.

Priya More

Mumbai Heavy Rain: मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा (Mumbai Heavy Rainfall) फटका रेल्वेसेवेला बसला आहे. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. तसंच अंबरनाथ- बदलापूर स्थानकादरम्यान देखील रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल सेवेसोबतच लांबपल्ल्याच्या रेल्वेसेवा देखील विस्कळीत झाली आहे.

त्याचसोबत लोणावळा आणि खंडाळा घाटामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अचानक रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे लांबपल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. अशामध्ये मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या ५ रेल्वेगाडया रद्द करण्यात आल्या आहेत.

या पावासामुळे मुंबईवरुन बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे देखील खोळंबल्या आहेत. बदलापूर स्थानकावर काही रेल्वे थांबल्या होत्या. मुसळधार पाऊस आणि रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यामुळे मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि पुण्यावरुन मुंबईच्या दिशेला येणाऱ्या रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, इंटरसीटी एक्सप्रेस, डेक्कन एक्स्प्रेस आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या ५ रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्याकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या अचानक रद्द झाल्यामुळे कामानिमित्त मुंबईवरुन पुण्याला आणि पुण्यावरुन मुंबईला येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. आज त्यांचा कामाचा खाडा झाला आहे. महत्वाचे काम असल्यामुळे काही जणांनी पर्यायी मार्गाने कामाचे ठिकाण गाठले पण त्यांना लेटमार्क लागला आहे. तसंच जोडीचा रेक उपलब्ध नसल्याने २० जुलै म्हणजे उद्या देखील पुण्याकडे जाणारी आणि येणारी रेल्वेसेवा बंद राहणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या देखील दोन्ही दिशेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

१९ जुलै रोजी रद्द झालेल्या रेल्वे गाड्या -

अप मार्गावर

12128 - पुणे-सीएसएमटी इंटरसीटी एक्स्प्रेस

11008 - पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस

22106 - पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस

डाऊन मार्गावर -

12123 - सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

11009 - सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस

२० जुलै रोजी रद्द झालेल्या रेल्वे गाड्या -

अप मार्गावर -

12124 - पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

11010 - पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस

डाऊन मार्गावर -

12127 - सीएसएमटी-पुणे इंटरसीटी एक्स्प्रेस

11007 - सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस

22105 - सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT