5 injured in a road accident at dasgaon on mumbai goa highway saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच जखमी; चुकीच्या वळण मार्गामुळे दासगावमधील स्थानिक आक्रमक

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad News :

मुंबई गोवा महामार्गावर (mumbai goa highway) दासगाव येथे एका कारला अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान चुकीच्या डायर्व्हजनमुळे या परिसरात सातत्याने अपघात होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. (Maharashtra News)

मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यात दासगाव गाव हद्दीत रविवारी रात्री कार आणि ट्रक यांच्यामध्ये अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता कि या अपघातामध्ये अपघातग्रस्त कार रस्त्यावरील डिव्हायडरच्या क्रॅश बॅरीअरवर जाऊन आडकली.

या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला तर चार जण किरकोळ जखमी झालेत. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान रविवारी दिवसभरातील हा दुसरा अपघात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या परिसरात सकाळी झालेल्या अपघातात एका तरूणीचा मृत्यु झाला. या आठवड्याभरात दासगाव खिंड ते वहुर गाव हद्दीदरम्यान अनेक छोटे अपघात झाले आहेत. या महामार्गावर बांधकाम ठेकेदार कंपनीने चुकीच्या पद्धतीने डायर्व्हजन ठेवल्याने हे अपघात होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT