Ambernath Breaking News saam tv
मुंबई/पुणे

Breaking News: अंबरनाथमध्ये इमारतीचं स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना; ४५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Breaking News: अंबरनाथमध्ये इमारतीच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळल्याची मोठी घटना घडली. या घटनेत ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अजय दुधाणे

Ambernath News In Marathi

अंबरनाथमधून मोठी दुर्घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये इमारतीच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळल्याची मोठी घटना घडली. या घटनेत ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज शनिवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये स्लॅबचे प्लास्टर कोसळून एका महिलेचा झोपेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंबरनाथमधील फातिमा शाळा परिसरातील अण्णा इमारतीमधील ही घटना आहे. आज शनिवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथमधील अण्णा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे प्लास्टर खाली कोसळलं. या घटनेत ४५ वर्षीय गीता गुप्ता यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेत ४५ वर्षीय गीता गुप्ता यांचा झोपेत असतानाच जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उल्हासनगरमध्ये कारला भीषण आग

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील उपविभागीय कार्यालय येथे उभी असलेल्या एका कारला भीषण आग लागली. या आगीत कार जाळून खाक झाली आहे. दुपारच्या वेळेस या कारने पेट घेतला.

स्थानिकांनी या कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग विझत नव्हती. यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाने काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग कशी लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT