40 years old women Physical abuse on 16 year old boy mumbai City Shocking incident Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: ४० वर्षीय मामीचा १६ वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार; मुंबईतील खळबळजनक घटना, पोलिसांत गुन्हा

Mumbai Crime News: मामाच्या घरी राहायला आलेल्या १६ वर्षीय भाच्यावर ४० वर्षीय मामीने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे.

Satish Daud

Married women Physical abuse 16 years Old boy

मामाच्या घरी राहायला आलेल्या १६ वर्षीय भाच्यावर ४० वर्षीय मामीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी विकृत मामीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय अत्याचार पीडित मुलगा मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्याचा मामा मुंबईच्या ताडदेव परिसरात राहतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षभरापूर्वी पीडित मुलगा मामाच्या घरी राहण्यासाठी आला होता. यावेळी पती घरात नसल्याचा फायदा घेत मामीने भाच्याला धमकावले. तुला गावी पाठवून देईन, असं म्हणत विकृत मामीने भाच्यावर जबदस्तीने अतिप्रसंग केला.

याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, मामीचं घृणास्पद कृत्य दिवसेंदिवस वाढत होतं. पती घरात नसताना ती भाच्यावर अत्याचार करत होती. यादरम्यान, भाच्याने अनेकवेळा मामीच्या कृत्याला विरोध केला.

तेव्हा मामीने त्याला जेवणही देणे बंद केले. तसेच अनेकदा त्याला मारहाण देखील केली. मार्च २०२३ पासून हा प्रकार सुरू होता. अखेर मामीच्या कृत्याची माहिती मुलाने आपल्या आईला सांगितली.

मुलावर अत्याचार झाल्याचे कळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी तातडीने मुंबई गाठत मामीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. जेव्हा हे प्रकरण पोलिसांत गेलं, तेव्हा भाचा २० वर्षीय असून आम्ही सहमतीने संबंध ठेवल्याचा दावा महिलेने केला.

मात्र, जेव्हा पोलिसांनी सर्व प्रकरणाची चौकशी केली असता, भाच्याचं वय १६ वर्ष निघालं. याप्रकरणी पोलिसांनी विकृत महिलेविरोधात बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिकचा तपास ताडदेवी पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT