दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना पडून 4 तरुणांचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना (पहा Video)  Saam Tv
मुंबई/पुणे

दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना पडून 4 तरुणांचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना (पहा Video)

पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत लोणी स्टेशन परीसरात एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करत असताना, टाकीमध्ये गुदमरुन तब्बल चौघांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घडली आहे. मृत्यु झालेल्यात टाकी साफ करण्याकरिता उतरण्यासाठी उतरलेल्या ३ कामगारांचा (workers) तर त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या एका नागरीकांचा समावेश आहे.

पहा व्हिडिओ-

ही दुर्देवी घटना आज सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे (वय -४५) रा.पाण्याची टाकी संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, पद्माकर मारुती वाघमारे (वय-४३, पठारे वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय- २६ रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर, (Solapur) सोलापूर), रुपचंद उर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे, (वय- ४५, रा. सध्या घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मुळ गाव केळेवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) या चौघांचा मृत्यु झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिस (Police) आणि वाघोली फायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेगवान हालचाली करत चारही जनांचे मृतदेह टाकीतुन बाहेर काढले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT