3 Bangladeshi nationals arrested SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईत घुसखोरी; ३ बांगलादेशींना अटक, अंधेरी पोलीस-ATS ची कारवाई

Mumbai Crime News : मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक आणि अंधेरी पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. दोन्ही तपास यंत्रणांना ही माहिती गुप्त खबऱ्यांमार्फत मिळाली होती. या माहितीची खात्री पटल्यानंतर ही धडक कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ वेगवेगळ्या परिसरांत वास्तव्य करणाऱ्या ३ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक आणि अंधेरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हे तिन्ही बांगलादेशी नागरिक भारतात अवैध मार्गाने घुसले होते. (Latest Marathi News)

मागील अनेक वर्षंपासून ते या परिसरांत वास्तव्य करत होते. अब्दुल आजाद अब्दुल हाय फारूक, मोहम्मद शरीफ रफिक गाझी आणि अख्तर अब्दुल रहमान शहा अशी अटक करण्यात आलेल्या तीन बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. (Mumbai Police)

अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन बांगलादेशी नागरिक अवैधपणे मागील अनेक वर्षंपासून वास्तव्यास असल्याची माहिती खबऱ्यांकडून अंधेरी पोलीस ठाण्याला मिळाली होती. यानंतर मिळालेल्या माहितीची खात्री करून अंधेरी पोलीस ठाणे आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या तुकडीने तीन बांगलादेशींना मोगरापाडा, कोल डोंगरी आणि जे बी नगर मेट्रो स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. यातील दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून एक आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार हसबे यांनी दिली.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT