Lonavala News  Saam TV
मुंबई/पुणे

Lonavala News : लोणावळा टायगर पॉईंटवरुन पडून २१ वर्षीय इंजिनीअरिंगच्या तरुणीचा मृत्यू

Lonavala Tiger Point News : साक्षी पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथील डॉ. डीवाय पाटील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग चं शिक्षण घेत होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

Lonavala News :

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवरून दरीत पडून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साक्षी रमेश होरे असं 21 वर्षीय मृत मुलीचं नाव आहे.

साक्षी पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथील डॉ. डीवाय पाटील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग चं शिक्षण घेत होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

साक्षी लोणावळ्याला कशासाठी आली होती? कुणासोबत आली होती? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. साक्षी कड्यावरुन पाय घसरुन खाली पडली की तिने आत्महत्या केली, हे समजू शकलेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)ृ

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, घटनास्थळी लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांची टीम दाखल झाली.

रेस्क्यू टीमने जखमी साक्षीला टायगर पॉईंटच्या दरीतून बाहेर काढले. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला, असल्याचं खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रायगडच्या हिरकणी कड्यावर अडकले होते दोन तरुण

काही दिवसांपूर्वी शिवजयंतीदिनी हिरकणी कड्यावर फिरायला गेलेले दोन तरुण अडकले होते. दोघेजण कड्यावर अडकल्याचे समजताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. रेस्क्यू टीमन स्थानिकांच्या मदतीने दोन्ही तरुणांची सुटका केली. ट्रेकिंग करताना दोघेजण कड्याच्या मध्यभागी आले होते. त्यावेळी त्यांना खाली उतरणे किंवा पुन्हा गडावर जाणे कठीण झाले. त्यामुळे दोघेही दगडाचा आधार घेत तेथेच थांबले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Nashik Accident: साई भक्तांवर काळाचा घाला, शिर्डीला जाताना कारचा चक्काचूर, ३ भाविकांचा जागीच मृत्यू

Jio Cheapest Recharge: जिओची धमाकेदार ऑफर! ११ महिन्यांचा स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह बरंच काही...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑक्टोबरचे ₹१५०० मिळणार नाही? संभाव्य कारण आलं समोर

Crime News: गोरक्षकांकडून मारहाण; सोशल मीडियावरील बदनामीमुळं तरुणानं संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT