धक्कादायक! मुंबईत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार; खून करून इमारतीत सोडला मृतदेह Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! मुंबईत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार; खून करून इमारतीत सोडला मृतदेह

मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये असलेल्या एचडीआयएल कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: अवघ्या दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील शक्तीमिल कंपाउंड बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा न देता ती जन्मठेपेची करण्यात आली. असे असतानाच मुंबई (Mumbai) पुन्हा एकदा अशाच एका घटनेने हादरून गेली आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये असलेल्या एचडीआयएल कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीवर बलात्कार ( Sexual Assault) करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

कुर्लाच्या (Kurla, Mumbai) एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर त्वरित मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात नराधमविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला त्यानंतर, मुलीची मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यात बेपत्ता झालेल्या मुलीची नोंद घेण्यास सुरूवात केली आहे.

इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये उघडकीस आला प्रकार!

मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत बंद असल्याने एक १८ वर्षाचा मुलगा आपल्या दोन मित्रांसह इंस्टाग्रामवर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला असताना, त्याने हा मृतदेह पाहून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवले. या मुलीच्या डोक्यावर गंभीर जखम असून घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात बलात्कारासह हत्येचा गुन्हा अनोळखी आरोपी विरोधोत नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT