Manpada Police Station  Saamtv
मुंबई/पुणे

Dombivli Crime : मोबाईलपेक्षा अभ्यास कर, आईने सांगताच तरूणीने रागात उचललं टोकाचं पाऊल; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivli Crime News : डोंबिवलीत एका तरुणीने मोबाईलसाठी जीवन संपवलं आहे. तरुणीने रागाच्या भरात उचलल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : डोंबिवलीत एका तरुणीने मोबाईलसाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईने मोबाईल वापरण्यास दिला नसल्याने तरुणीने रागाच्या भरात आत्महत्या केली. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आईने मोबाईल हाताळण्यास दिला नाही म्हणून रागाच्या भरात एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरात घडली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात हद्दीत घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे. या प्रकरणाची नोंद मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये करण्यायत आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत .

संजना हेमांगी झोरे असे मृत तरुणीचे नाव आहे. हेमांगी झोरे यांनी यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे. आई हेमांगी आणि संजना डोंबिवली देसलेपाडा येथील लोढा हेरिटेजमधील एका गृहसंकुलात राहते. मृत मुलीची आई हेमांगी या नोकरी करतात. संजना शिक्षण घेत होती.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी रात्री संजना आणि तिची आई या दोघी घरात होत्या. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास संजनाने आईकडे मोबाईल वापरण्यास मागितला. त्यावेळी आईने मोबाईलपेक्षा अभ्यास कर, असा सल्ला देत तिला मोबाईल देण्यास नकार दिला. संजनाला राग आल्याने तिने घरातील जीवन संपवलं.

आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मुलगी आतून दरवाजा उघडत नव्हती. सोसायटीतील सदस्यांनी धावपळ करून खोलीत पाहिले. तर संजनाने जीवन संपवलं होतं. मानपाडा पोलिसांना ही माहिती देण्यास आली. मुलीला तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

Grapes Cleaning: तुम्ही द्राक्षे धुवून लगेच खाताय का? व्यवस्थित स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

SCROLL FOR NEXT