Thane Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking News : प्रेमाचा दुर्दैवी अंत! घरात कोणीही नसल्याचं पाहिलं, रागारागात आलेल्या बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला पेटवलं, नेमकं काय घडलं?

Thane Crime News : ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने रागारागात आपल्या प्रेयसीला पेटवून दिलं आहे. पीडित मुलगी ८० टक्के भाजली असून तिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

Alisha Khedekar

ठाण्यात १७ वर्षीय मुलाने प्रेयसीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना

पीडित तरुणी ८० टक्के भाजली असून केईएम रुग्णालयात उपचार सुरू

आरोपी मुलाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पोलिस तपासात प्रेमातील वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज

ठाण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने रागारागात आपल्या प्रेयसीला पेटवून दिले आहे. हा आगीचा भडका इतका भयंकर होता की अल्पवयीन मुलगी ८० टक्के भाजली आहे. सदर पीडितेला मुंबईतील केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने ठाणे हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिच्या प्रियकरामध्ये वारंवार वादविवाद सुरु होते. काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरातही त्यांच्यात भांडण झाले होते, ज्यामध्ये मुलाने मुलीला धमकी दिली होती की तो तिला जिवंत सोडणार नाही. अनेक जुन्या वादातून आरोपी मुलाने मुलीच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधून तिच्या घरात घुसला. तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकत तिला पेटवलं.

आरोपी मुलगा तिथून पळून न जात तिथेच थांबून जळत्या आगीत होरपळणाऱ्या पीडितेची मजा घेत होता. थोड्या वेळाने घरातून धूर बाहेर जाऊ लागल्याने शेजाऱ्यांना संशय आला असता त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाच्या मुसक्या आवळल्या. तसेच पीडितेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने मुंबईतील नामांकित केईम हॉस्पिटल येथे रेफर केले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी ८० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. शिवाय तिच्या अंतर्गत अवयवांना जास्त प्रमाणावर इजा झाली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १०९ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की हा हल्ला पूर्वीच्या भांडणातून आणि रागातून झाला होता. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने अद्याप तिचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि आरोपीची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Winter Health: हिवाळ्यात दिवसभर किती लिटर पाणी प्यावे?

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT