theft saam tv
मुंबई/पुणे

SBI च्या एटीएमवर चाेरांचा डल्ला; १७ लाख २१ हजार ९०० रुपये लांबविले

विरार पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

चेतन इंगळे

विरार : विरार पूर्व (virar) येथील गांधी चौक परिसरातील एसबीआय बॅंकेच्या एटीएम (ATM) सेंटरमधूल 17 लाख 21 हजार 900 रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा विरार पाेलीस (virar police) तपास करीत आहेत. (virar latest crime news)

याबाबत पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी : आज पहाटे चारच्या सुमारास गांधी चाैकातील राजा अपार्टमेंट येथे असणा-या एसबीआय बॅंकेचे एटीएम सेंटरमधील एटीएम मशिन गॅसकटरने ताेडण्यात आले.

त्यानंतर त्यातून राेकड पळविण्यात आली. बॅंकेच्या अधिकारी वर्गास ही चाेरीची घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी पाेलीसांत तक्रार नाेंदवली आहे. या एटीएम केंद्रातून सुमारे 17 लाख रुपये चाेरीस गेले आहेत. आम्ही सीसीटीव्ही कॅमेरामधील चित्रीकरणाची पाहणी करीत आहाेत. लवकरच आरोपींना शोधून काढू असा विश्वास पाेलीसांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT