Afghan Church Saam Digital
मुंबई/पुणे

Afghan Church : कुलाब्यातील १६५ वर्षे जुन्या अफगाण चर्चचा जीर्णोद्धार, या दिवशी होणार सर्वसामान्यांसाठी खुले

165 Year Old Afghan Church : मुंबईतील कुलाबा येथे असलेल्या १६५ वर्षे जुन्या अफगाण वॉर मेमोरियल चर्चचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला. येत्या ३ मार्च २०२४ रोजी हे चर्च सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.

Sandeep Gawade

Afghan Church

मुंबईतील कुलाबा येथे असलेल्या १६५ वर्षे जुन्या अफगाण वॉर मेमोरियल चर्चचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला. येत्या ३ मार्च २०२४ रोजी हे चर्च सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. वर्ल्‍ड मोन्युमेंट्स फंड इंडियाने (डब्‍ल्‍यूएमएफआय) ‘सिटी’कडून मिळलेल्‍या निधीसाहाय्याच्‍या माध्‍यमातून अफगाण चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. मार्च २०२२ मध्ये हे काम सुरू झाले आणि २४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत ते पूर्ण करण्यात आले.

चर्च ऑफ सेंट जॉन द इव्हँजेलिस्ट सामान्यतः अफगाण चर्च म्हणून ओळखले जाते. ही एक अँग्लिकन वास्‍तू असून, ही इमारत आणि तिची मांडणी मुंबईच्या सुरुवातीच्या वसाहतीचा उत्‍कृष्‍ट नमुना आहे. सुरुवातीला ‘गॅरिसन चर्च’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या चर्चला ‘ब्राइड्स चर्च’ असे नाव मिळाले. हेन्री कोनीबियर यांनी डिझाइन केलेले अफगाण चर्च बॉम्बे आर्मी, मद्रास आर्मी, बंगाल आर्मी व एचएम आर्मी आणि पहिले अँग्लो-अफगाण युद्ध-१ (१८३८-१९४०) व दुसरे अँग्लो-अफगाण युद्ध-२ (१८७८-१८८०) मध्ये लढलेल्या इतर रेजिमेंटसह विविध रेजिमेंटच्‍या आठवणींना उजाळा देते.

डब्‍ल्‍यूएमएफआयच्या तज्ज्ञ संरक्षण सल्लागार कीर्तिदा उनवाला यांच्‍या माध्‍यमातून चर्चची सर्वसमावेशक संवर्धन योजना तयार करण्यात आली. जेएसडब्‍ल्‍यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाच्या बोर्ड सदस्य संगीता जिंदाल म्‍हणाल्‍या, ‘अफगाण चर्च हे भारताच्या चर्चच्या वास्तुकलेतील एक उल्लेखनीय रत्न आहे, जे बॉम्बे हार्बरमध्ये प्रवेश करणाऱ्या जहाजांसाठी मार्गदर्शक दिवा म्हणून काम करत आहे. जीर्णोद्धार प्रकल्पामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात स्वारस्य निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT