Pune Kharadi News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: जलतरण तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

Pune Kharadi News: मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा खाजगी जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे शहरातील खराडी परिसरात मंगळवारी (ता. १६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

Pune News Today

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा खाजगी जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे शहरातील खराडी परिसरात मंगळवारी (ता. १६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. अतिक नदीम तांबोळी (वय १७ रा. गणेश नगर, वडगाव शेरी) असे मृत मुलाचे नाव आहे. जलतरण तलावाच्या संचालकांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. (Breaking Marathi News)

जलतरण तलावाच्या संचालकांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी तक्रार देखील पालकांनी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चंदननगर पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. मुलाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक हा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो नुकतेच पोहायला शिकला होता.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अतिक आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी चंदननगर येथे असलेल्या खालसा जलतरण तलावात (Swimming Pool) गेला होता. दरम्यान, अतिकने पोहण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्याने त्याला अंदाज आला नाही.

त्यामुळे अतिकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही अतिक पाण्याबाहेर न आल्याने त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी या घटनेची माहिती जिमच्या संचालकांना दिली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तिथे कोणीही जीवरक्षक उपस्थित नव्हते. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद होते.

दरम्यान, जिमच्या व्यवस्थापकांनी तातडीने पुलाच्या दिशेने धाव घेत अतिकला पाण्याबाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु उपचारापूर्वीच त्याचा बुडुन मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने सांगितले. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT