Mumbai Airport Customs seized 12 Kg gold Twitter/@ANI
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर तस्करीसाठी आणलेलं १२ किलो सोनं जप्त; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

Mumbai Airport Customs seized 12 Kg gold: बिस्कीटाच्या स्वरुपात असलेल्या या सोन्याची किंमत ही तब्बल ५ कोटी ३८ लाख एवढी आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानळावर सीमाशुल्क विभागाच्या (Custom Depertment) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. तस्करीसाठी (Gold Smuggling) आणलेले तब्बल १२ किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. बिस्कीटाच्या स्वरुपात असलेल्या या सोन्याची किंमत ही तब्बल ५ कोटी ३८ लाख एवढी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सोन आणण्यासाठी तस्करांनी खास शक्कल लढवली होती. तस्करांनी ही सोन्याची बिस्कीटं एका बेल्टमध्ये लपवली होती, मात्र अधिकांऱ्यांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत आणि त्यांना विमातळावरच पकडण्यात आलं. (Gold Smuggling in Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, े सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. याप्रकरणी सूदान येथून आलेल्या ६ आरोपींना कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत विमानतळावर सध्या याबाबत चौकशी केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं कुठून आलं आणि ते कुणाकडून आणलं याचा तपास केला जाणार आहे. तसेच सोनं विदेशात नेमकं कुठे नेण्यात येणार होतं याचादेखील कस्टमचे अधिकारी तपास करणार आहेत. (Officers of Mumbai Airport Customs seized 12 Kg gold valued at Rs 5.38 Cr)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT