Eleventh Class Admission
Eleventh Class Admission saam tv
मुंबई/पुणे

11th Admission News: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख ठरली; जाणून घ्या केव्हा होणार सुरूवात

साम टिव्ही ब्युरो

Eleventh Class Admission News: दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला जर पुणे-मुंबई सारख्या महानगरांतील शाळांमध्ये अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आत्ताच तयारीला लागावे लागेल. कारण, अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून, विद्यार्थ्यांना येत्या २५ मे पासून ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे. (Breaking Marathi News)

या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत असणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील महानगर पालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यासाठी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे (Pune News) व पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात.

२०२३-२४ या वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक राज्याचे नवनियुक्त माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी येत्या २० ते २४ मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करू शकतात, असे देखील राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. (Latest Marathi News)

कशी असेल अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया

प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाईल. दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस आणि विशेष प्रवेश फेरी १ सात ते आठ दिवस राबविण्यात येईल, असे राज्य मंडळातर्फे नमूद करण्यात आले आहे.

उच्च माध्यमिक विद्यालयांना २० मे ते इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत नोंदणी करता येणार आहे. इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उपलब्ध करून दिला जाईल. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागणार आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT