Ahmednagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Ahmednagar Crime: नगर हादरलं! 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर 9 जणांकडून अनैसर्गिक अत्याचार

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगरमध्ये एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

Satish Kengar

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar Crime News) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्रीरामपूर शहरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. नऊ जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस (Police ) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पुण्यातही ५ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार

दरम्यान, पुण्यातही (Pune) अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. येथील कोंढव्यामध्ये ५ वर्षाच्या मुलावर ३ अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केला होता. पीडित मुलासोबत पॉर्न व्हिडीओ (VIDEO) दाखवत अनैसर्गिक कृत्य करण्यात आलं होतं. याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा सोसायटीत खेळत असताना आरोप मुलांनी मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. यात धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार पीडित मुलाच्या मोठ्या भावासमोर घडला. पोलीस याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT