Omicron : धोकादाय देशांतून महाराष्ट्रात आलेले १०९ नागरिक संपर्काबाहेर  saam tv
मुंबई/पुणे

Omicron : धोकादाय देशांतून महाराष्ट्रात आलेले १०९ नागरिक संपर्काबाहेर

काही लोकांनी चुकीचे फोन नंबर दिले, तर काहींनी दिलेल्या पत्त्यावरील घरांना कुलूप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) सध्या संपूर्ण देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच महाराष्ट्रात मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) ओमिक्रॉनचे १० रुग्ण आढळून आले आहेत. संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. मात्र यामध्ये आता मोठ्या अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. धोकादायक देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे.

हे देखील पहा -

धोकादायक देशातून भारतात दाखल झाल्यानंतर RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतू परदेशातून कल्याण-डोंबिवलीमध्ये आलेल्या २९५ नागरिकांपैकी १०९ जणांचा अद्याप संपर्क झालेला नसल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या २९५ नागरिकांपैकी ८८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित ४८ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. यातील ३४ लोकं ही केडीएमसीच्या बाहेरचे रहिवासीआहेत. उर्वरित १०९ संपर्कच होत नसल्याची माहिती सुर्यवंशी यांनी दिली आहे.

या १०९ जणांशी संपर्क साधण्यासाठी केडीएमसी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, काही लोकांनी चुकीचे फोन नंबर दिले, तर काहींनी दिलेल्या पत्त्यावरील घरांना कुलूप आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT