unnar Pimpalwandi crime  साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

दिवसभर लेकीचा शोध घेतला, पण शेवटी शेतात जे दिसलं त्याने कुटुंब हादरलं! पुण्यातील 'त्या' घटनेने उडाली खळबळ

unnar Pimpalwandi crime : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून ग्रामस्थांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, पुणे प्रतिनिधी

10-year-old girl assault and murder case in Junnar : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी दिवसभर तिचा शोध घेतला. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुलीच्या घराजवळच राहणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. मुलीची आणि आरोपीची पूर्वीपासून ओळख असल्याने, त्याने तिला घराजवळील शेतात नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

त्यानंतर आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तिच्या गळ्यावर गंभीर जखम करून हत्या करण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि मृत्यूचे नेमके कारण अधिकृत वैद्यकीय व पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

१० वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा अशा क्रूरपणे अंत झाल्याने पिंपळवंडी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर कोणतीही दया न दाखवता त्याला कठोर शिक्षा द्यावी आणि या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून त्याला फाशीचीच शिक्षा मिळवून द्यावी, अशी तीव्र भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakul Preet Singh: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला झटका, आयकर विभागाकडून घरासह १२ ठिकाणी छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण गावच विक्रीला काढलं! ग्रामस्थांचा टोकाचा निर्णय

Homemade Honey Recipe : बाजारातलं महागडं मध खरेदी करणं सोडा, घरच्या घरी फक्त ३ पदार्थांपासून 'असे' बनवा शुद्ध मध!

Maharashtra News Live Update: उज्जैनमध्ये शाही मस्जिदचा वाद पेटला पोलिसांकडून लाठी चार्ज

Sanjay Raut: खासदार संजय राऊतांचे FDA अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप; थेट तुकाराम मुंढेंना पत्र धाडलं

SCROLL FOR NEXT