Uddhav Thackreay 
मुख्य बातम्या

‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’

अमोल कविटकर

चिपळूण : पावसामुळे चिपळूण शहराची वाताहात झाली आहे. आम्हांला मदत द्या. आमचे संसार उद्धवस्त झाले आहेत. आमदार, खासदारांचा पगार द्या अशी मागणी पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. (uddhav-thackreay-chiplun-narayan-rane-devendra-fadnavis-pravin-darekar-taliye-sml80)

या दाै-यात भास्कर जाधव, अनिल परब, उदय सामंत ही नेते मंडळी देखील आहेत. त्यांच्याकडे देखील नागरिक मदतीची अपेक्षा करीत आहेत.

चिपळुणचा दाैरा करण्यापुर्वी मुख्यमंत्री ठाकरे हे गुहाघर येथे आले हाेते. तेथून ते चिपळूणला आला. चिपळूणला मुख्यमंत्री ठाकरे यांनी पायी दाैरा केला. त्यावेळी काही पूरग्रस्तांनी आक्रमक हाेत त्यांच्याकडे केवळ आश्वासन नकाे, मदत द्या अशी मागणी केली.

आमदार, खासदारांचा पगार द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाहणी दाै-यात अनेक स्थानिकांना त्यांच्या भावना अनावर झाल्या. यावेळी पूरामुळे नुकासन झालेल्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे संताप व्यक्त केला. एका ठिकाणी महिलेने अश्रुांच्या आेघात आमचं शेत गेले, दुकाने गेले, घर गेले आता काेकणवासियांच्या मदतीसाठी आमदार, खासदारांचा पगार द्या. तुम्ही आमच्यासाठी काही तरी करा अशी मागणी केली.

यावेळी काहीसा गाेंधळ निर्माण झाला. बहुतांश व्यावसायिकांचा स्थानिक प्रशासनावर राेष हाेता. त्यांनी आधीच सांगतिले असते तर आम्ही आमचे साहित्य हलवले असते असे स्पष्ट केले.

तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूणमधील व्यावसायिक व दुकानदारांना धीर दिला. परंतु दुकानदार हे आक्रमक हाेते. त्यांनी तातडीने मदतीचे पहा असे पुन्हा पुन्हा मुख्यमंत्र्यांना सुनावले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

पाकिस्तानातही गणपती बाप्पा मोरया, कराचीत मराठी माणसाच्या बाप्पाची चर्चा

महाराष्ट्र सर्वात मोठं बहुभाषिक राज्य, शाहांच्या विधानावरून वाद पेटला

Britain News: देशाचे तीन भागात होणार विभाजन; नेत्यांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या

Fact Check: बुरखाधारी महिलेच्या हातात गणपती बाप्पा? मुंबईत मुस्लीम महिला गणपती घेऊन का फिरतेय?

SCROLL FOR NEXT