पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी
पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी 
मुख्य बातम्या

नांदेड परिक्षेत्रात अवैध धंदे चालू देणार नाही - निसार तांबोळी

Pralhad Kamble

नांदेड : नांदेड परिक्षेत्रांतर्गत मटका, जुगार, दारु, गांजा आणि गुटखा असे अवैध धंदे जोमाने सुरु असल्याच्या वर्तमानपत्रातील येणाऱ्या बातम्या लक्षात घेता नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी अवैध धंद्याविरुद्ध कडक भुमिका घेत शुक्रवारी (ता. नऊ) जुलै रोजी विशेष मोहिम राबविली. या मोहिमेंतर्गत परिक्षेत्रात ३७० कारवाया करुन ४८५ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३६ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवायामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. ही माहिती नांदेड परिक्षेत्र कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्राद्वारे देण्यात आली.

नांदेड परिक्षेत्रांतर्गत नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. या चारही जिल्ह्यात मटका, गुटखा, गांजा (एनडीपीएस) आणि दारु असे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्तयाच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असल्याने या बाबतीत स्वत: श्री. तांबोळी यांनी लक्ष घातले. यासाठी त्यांनी परिक्षेत्रात विशेष मोहिम राबविली. यापूर्वी त्यांनी चारही पोलिस अधीक्षकांची एक बैठक घेऊन त्यांना सुचना केल्या. त्यांच्या आदेशावरुन चारही जिल्ह्यात विशेष मोहिम राबवत मटका, गुटखा, जुगार, दारु आणि गांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.

हेही वाचा - लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंप व्यवस्थापकाच्या डोळ्यात तिखट टाकून चाकूने जखमी करुन त्यांच्याकडील साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करणारी टोळी जेरबंद

या कारवाईमध्ये मटका जुगारात ६५ कारवाई करुन ७६ आरोंपीविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून दोन लाख ८३ हजार ४८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. जुगाराच्या प्रकरणात ४१ कारवाईअंतर्गत १२६ जणांवर गुन्हे दाखल करुन नऊ लाख २६ हजार ६३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर दारु या प्रकरणी २५७ कारवायातून २६९ जणांवर गुन्हे दाखल करुन १८ लाख ९० हजार ८०७ रुपयाचा मुद्देमाल जप्त, गांजा या सदराखाली दोन कारवाया करुन तिघांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून दोन लाख ५३ हजार ८५ रुपयाचा मुद्मेमाल जप्त केला. तसेच गुटखा प्रकरणात पाच कारवाया करुन १६ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून दोन लाख ९९ हजार ४२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईसाठी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, परभणीचे पोलिस अधीक्षक जयंत मिना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, हिंगोलीचे पोलिस अधीक्षक ( प्रभारी ) यशवंत काळे, लातूरचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

यापुढेही अचानक अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा सुरुच राहिल, आणि परिक्षेत्रात अवैध धंदे चालू देणार नाही असा इशारा दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Hardik Pandya Statement: 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो..' मुंबईच्या विजयानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Utkarasha Rupvate Car Attack | वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंच्या गाडीवर दगडफेक

Beed Constituency: पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंना नोटीस, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 48 तासांमध्ये मागवला खुलासा; जाणून घ्या कारण

Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव शक्य नाही; सुप्रिया सुळे विक्रमी मताने जिंकतील... संजय राऊतांना विश्वास

SCROLL FOR NEXT