chiplun flood update 
मुख्य बातम्या

वायुसेनेकडून बचाव कार्याला सुरुवात; दाेघांना केले एअरलिप्ट

अमोल कलये

चिपळुण : पावासाच्या पाण्याने वेढलेल्या चिपळुण शहरातील पाणी कमी हाेऊ लागले आहे. एनडीआरएफचे पथक दाखल झाल्याने येथील मदत कार्यास वेग आला आहे. आत्ता पर्यंत 35 नागरिकांना पथकाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. दरम्यान वायुसेनेने दाेन जणांना एअरलिफ्ट केले आहे. (ndrf-chiplun-maharashtra-rain-update-sml80)

महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना सैन्यदल, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक मदत करीत आहेत. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह काेकणला जाेरदार फटका बसला आहे.

गुरुवारी संपुर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेले हाेते. आज (शुक्रवार) एनडीआरएफच्या पथकाने मदत कार्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. या पूराच्या पाण्यात साधारणतः पाच हजार नागरिक अडकले आहेत. सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी युद्धापातळीवर मदत कार्य सुरू झाले आहे.

चिपळूणला सन 2005 नंतर भीषणपरिस्थिती उद्भवली आहे. वाशिष्ठी, शिव नदीला पूर आला आहे. खेडमध्येही जगबुडी नदीला महापूर आला आहे. यामुळे अनेक वाहन पाण्यात बुडाली आहेत. नागरिकांनी काळजी करु नये मदत कार्याला सुरुवात झाली आहे. घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बोटीने बाहेर काढण्यात येत आहे असे प्रशासनाने कळविले chiplun flood update .

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

SCROLL FOR NEXT