पुराता वाहून गेलेल्या आई व मुलाचा मृतदेह सापडला
पुराता वाहून गेलेल्या आई व मुलाचा मृतदेह सापडला 
मुख्य बातम्या

पुरात वाहून गेलीली आई, मुलगा सापडला, औंढा तालुक्यातील घटना

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

राजेश दार्वेकर

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) : तालूक्यातील कोंडसी (असोला) येथील ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने आई व मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. रात्रभर शोध घेतल्यानंतर सोमवारी (ता. १२) सकाळी आई व मुलाचा मृतदेह सापडला.

औरंगाबाद येथील सातारा परिसरात राहणारे योगेश पडोळ हे पत्नी वर्षा, मुलगा श्रेयस व त्यांचे नातेवाईक रामदास शेळके चौघे जण कार ( एम एच २० सीएम १८७२) ने औंढा तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे कार्यक्रम आले होते. येथे कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला) मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे ओढ्याला पुर आला होता.

हेही वाचा - जोरदार आलेल्या पावसाने परभणी शहराची दानादान उडाली असून अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने लोकांना रात्र जागून काढावी लागली

चालक योगेश यांना ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांनी कार पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कार पुढे जात नव्हती त्यामुळे गाडीतील चौघेही खाली उतरले मात्र पाण्याचा लोंढा अधिक गतीने आल्याने, योगेश, वर्षा व श्रेयस व रामदास पाण्यात वाहून गेले, योगेश एका झाडाला अडकले ते त्यातून असे बसे बाहेर निघाले रामदास शेळके पोहत बाहेर निघाले. मात्र वर्षी व श्रेयस पाण्यात वाहून गेले. त्यानंतर रामदास व योगेश यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली गावकऱ्यांनी ही घटना हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक गजानन मोरे यांना कळविली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. मात्र अधिक उशीर झाल्याने आज सकाळी हे शोध कार्य सुरू झाले. ओढ्याच्या काठावर वर्षा व श्रेयस या दोघांचे मृतदेह सापडले. दरम्यान, घटनास्थळी तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे आदी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT